नेरूळ मधील 'त्या ' दुर्घटनाग्रस्त इमारतीची संदीप नाईक यांनी केली पाहणी

By कमलाकर कांबळे | Published: August 24, 2023 01:32 PM2023-08-24T13:32:02+5:302023-08-24T13:40:50+5:30

नेरुळ सेक्टर 6 येथील तुळसी भवन इमारतीचा बुधवारी रात्री स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली.

Sandeep Naik inspected 'that' disaster building in Nerul | नेरूळ मधील 'त्या ' दुर्घटनाग्रस्त इमारतीची संदीप नाईक यांनी केली पाहणी

नेरूळ मधील 'त्या ' दुर्घटनाग्रस्त इमारतीची संदीप नाईक यांनी केली पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: नेरूळ सेक्टर 6 येथील स्लॅब कोसळलेल्या तुळसी भवन सोसायटीला भाजपाचे नंबर जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी गुरुवारी भेट देऊन पाणी केली. तसेच जखमींची विचारपूस करून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

नेरुळ सेक्टर 6 येथील तुळसी भवन इमारतीचा बुधवारी रात्री स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. सदर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नूतनीकरणाचे काम सुरू होते.  तेव्हा अचानक तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने त्याखालील दोन स्लॅबदेखील कोसळले. 

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यु झाला आहे. तर यातील जखमींना जखमींना डी. वाय. पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमआयडीसी, गावठाण, सिडको निर्मित इमारती, तसेच वाणिज्य संकुलच्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी स्वतः पुढे येऊन  आपल्या घरांचे व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. त्यामुळे  जेणेकरून  अशा  दुर्घटनांना आळा बसेल, असे आवाहन संदीप नाईक यांनी केले.

Web Title: Sandeep Naik inspected 'that' disaster building in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.