संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 06:20 IST2025-01-17T06:15:40+5:302025-01-17T06:20:01+5:30

सिडको अध्यक्षपदाच्या अल्पकाळात शिरसाट यांनी अनेक निर्णय घेतले.

Sanjay Shirsat removed from the post of CIDCO Chairman | संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला

संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला

नवी मुंबई :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडील सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता त्यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने  पूर्वीच्या पदभारातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. 
सिडको अध्यक्षपदाच्या अल्पकाळात शिरसाट यांनी अनेक निर्णय घेतले. त्यापैकी काही निर्णय वादग्रस्त ठरले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी सिडको अध्यक्षपदाची सूत्रे स्वत:कडेच ठेवली होती. 
 

Web Title: Sanjay Shirsat removed from the post of CIDCO Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.