मयूर तांबडे
पनवेल : पनवेल तालुक्यात महामार्गासह अंतर्गत रस्त्यावर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, अनेक पुलांची दुरवस्था झाली असून वाहतुकीस धोकादायक बनले आहे. पैकी सहा पुलांच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजुरी मिळाली असून, कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. यातील तीन ठिकाणी जुने पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. एका ठिकाणी नव्याने पूल बांधण्यात येणार असून, दोन ठिकाणच्या पुलांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. या पुलांसाठी तब्बल सव्वापाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पनवेलमध्ये अरुंद पूल व कमी उंचीच्या पुलांचा प्रश्न कित्येक वर्षांपासून भेडसावत आहे. याचा त्रास वाहनचालक, परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. उमरोली येथील कमी उंचीचा पूल, केवाळे येथील अरुंद पूल, कोंडीची वाडी येथील लोखंडी व धोकादायक असलेला पूल, स्वप्ननगरी खानाव, महाळुंगी, मोहोदर येथील कमी रुंदीच्या पुलामुळे नागरिकांना वाहतूककोंडी व इतर समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर येथील सहा पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन. डी. पवार व राजीव डोंगरे यांनी दिली आहे.महाळुंगी येथे सद्यस्थितीत ६ बाय २ मीटर गाळे असलेला व १२ मीटर लांबीचा व ५ मीटर रु ंदीचा पूल आहे. या पुलाजवळ वळण असल्याने ते धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हा जुना पूल पडून येथे १२ मीटर लांबीचा व ८.२५ मीटर रुंदीचा नवीन पूल बांधण्यात येणार असून धोकादायक वळण काढले जाणार असून ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.वाहतुकीस अरुंद ठरणारा केवाळे पूल पाडण्यात येणार असून आता ८.२५ मीटरची रुंदी करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी २ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.स्वप्ननगरी (खानाव) व मोहोदर (चिंध्रण) येथील अरुंद असणाऱ्या दोन्ही पुलांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांची रुंदी सद्यस्थितीत ५ मीटर असून ही रुंदी ८.२५ मीटर करण्यात येणार आहे. स्वप्ननगरी येथील पुलासाठी ४० लाख तर मोहोदर येथील पुलाच्या रुंदीकरणासाठी ३५ लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरत असलेला उमरोली पूल देखील नव्याने बांधण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.नाबार्डकडून उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रु पये मंजूर करण्यात आले आहेत. उमरोलीचा जुना पूल पाडण्यात येणार असून नवीन पुलासाठी १० बाय १० मीटरचे ६ गाळे ठेवण्यात येणार आहेत, तर मालडुंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाºया कोंडीची वाडी या आदिवासी वाडीसाठी काँक्रीटचा पूल मंजूर करण्यात आलेला आहे. आदिवासी विकास विभागाकडून या पुलासाठी १ कोटी रु पयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.स्वप्ननगरी (खानाव) व मोहोदर (चिंध्रण), केवाळे, महाळुंगी चार पुलांची कामे महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेली असून त्यांची वर्कआॅर्डर झालेली आहे. १० जानेवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.तालुक्यातील पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मेअखेरीस ही कामे पूर्ण होतील. केवाळे आणि महाळुंगी येथील पूल पाडून वाहतुकीसाठी तात्पुरती बाजूने व्यवस्था करण्यात येणार आहे.- एन. डी. पवार,शाखा अभियंता, चिपळे, चिंध्रण