मराठा आरक्षणासाठी 'त्याने' छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सायकलने केला प्रवास
By योगेश पिंगळे | Published: January 26, 2024 09:46 AM2024-01-26T09:46:40+5:302024-01-26T09:47:18+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केल्याचे यावेळी सांगितले.
नवी मुंबई : आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. 26 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आंदोलन सुरु करण्यात येणार असून या आंदोलनसाठी जरांगे यांच्या सोबत 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने निघालेला लाखो मराठ्यांचा मोर्चा गुरुवारी रात्री नवी मुंबईत धडकला.
आरक्षणाच्या लढ्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर गावातील संजू जोशी या 20 वर्षीय तरुणाने चक्क सायकलने प्रवास केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून 20 जानेवारीला प्रवास सुरु केल्यावर अहमदनगरमध्ये जरांगे यांच्या मोर्च्यात तो सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर ते मुंबई हे अंतर मराठा मोर्च्यासोबत त्याने सायकल प्रवासाने पूर्ण केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केल्याचे यावेळी सांगितले.