समाधानकारक पर्जन्यवृष्टी, मोरबे धरणाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:16 AM2017-09-02T02:16:58+5:302017-09-02T02:17:11+5:30

महानगरपालिकेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात आले. समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० दशलक्ष क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण

Satisfactory rainfall, Harepurjan of Morbe dam | समाधानकारक पर्जन्यवृष्टी, मोरबे धरणाचे जलपूजन

समाधानकारक पर्जन्यवृष्टी, मोरबे धरणाचे जलपूजन

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात आले. समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० दशलक्ष क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण भरला असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३४०५.२०मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये मोरबे धरणाचा जलसाठा पूर्ण भरल्याने जलपूजन करण्यात आले होते. अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी जलसाठा पूर्ण भरून जलपूजनाची संधी उपलब्ध व्हावी अशी प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनावणे आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली. नवी मुंबईकरांनी पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिक सुखावले आहे. पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी कपातीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. यावेळी उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, पाणीपुरवठा समिती सभापती अंजली वाळुंज, अ प्रभाग समिती अध्यक्ष सुरेखा नरबागे, ब प्रभाग समिती अध्यक्ष रु पाली किस्मत भगत,
ड प्रभाग समिती अध्यक्ष संगीता बोºहाडे, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Satisfactory rainfall, Harepurjan of Morbe dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.