नवी मुंबई : भौतिक सुखात गुंतल्याने मनुष्याला परमेश्वराचा नामाचा विसर पडत आहे. सत्संगातूनच मानवाचा उध्दार शक्य असून त्यासाठी सर्वांनी सत्संग करावा, असे मौलिक उपदेश संत राजिंदर सिंह महाराज यांनी भक्तांना केला. ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित संत राजिंदर सिंह महाराजांच्या सत्संग सोहळ््याचा रविवारी समारोप झाला. दोन दिवसीय संत्सगात सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष राजिंदर सिंह महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले. देशभरातील विभिन्न प्रांतातील भाविकांनी याठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शंभराहून अधिक विदेशी भक्तही याठिकाणी उपस्थित होते. सत्संग सोहळ््यात भाविकांना जीवनात यशस्वी करण्याची सूत्रे सांगण्यात आली. नियमित ध्यानधारणा करण्याचा संदेश या माध्यमातून पोहोचविण्यात आला. सोहळ््यातंर्गत भाविकांना अध्यात्मिक दीक्षा प्रदान करण्यात आली. हजूर बाबा सावन सिंहजी महाराज, संत कृपाल सिंह जी महाराज, संत दर्शन सिंहजी महाराज यांचा वारसा पुढे चालवत २५ वर्षाहून अधिक काळापासून संत राजिंदर सिंह महाराज यांच्या माध्यमातून ध्यानधारणेचा योग्य विधी नागरिकांपर्यत पोहोचविला जात आहे. या दोन दिवसीय संदेशाच्या माध्यमातून प्रेम, एकता आणि शांतीचा संदेश पोहोचविण्यात आला.
सत्संगाने मानवाचा उध्दार होतो
By admin | Published: January 25, 2017 5:00 AM