मुंबई : अमरावती येथील सावनेर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. अमरावती जिल्ह्यातील खिरसाना-सावनेर मार्गावरील रस्त्याबाबतचा प्रश्न आज विधानसभेत आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी विचारला होता. पाटील म्हणाले, सावनेर रस्त्याचे काम यापूर्वी अमरावतीच्या जिल्हा परिषदेकडे होते. आता सदर काम जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. सदर रस्त्याचे काम विभागामार्फत करण्यात येणार आहे. रस्त्यावर दोन ठिकाणी लहान पुलांची आवश्यकता आहे.
सावनेर रस्त्याचे काम ‘साबां’कडे
By admin | Published: July 25, 2015 1:18 AM