सावरसई गावचा ‘एक गाव एक गणपती’

By Admin | Published: September 8, 2016 03:04 AM2016-09-08T03:04:59+5:302016-09-08T03:04:59+5:30

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव

Savasarai village's 'One village one Ganpati' | सावरसई गावचा ‘एक गाव एक गणपती’

सावरसई गावचा ‘एक गाव एक गणपती’

googlenewsNext

दत्ता म्हात्रे, पेण
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव बघता बघता शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. या सव्वाशे वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाच्या स्वरूपात आमूलाग्र्र बदल घडत गेलेले आपण पाहिले, विज्ञान तंत्रज्ञानाची भर उत्सवात पडलेली दिसून येत आहे. हा उत्सव कोट्यवधी भाविकांच्या मनमंदिरात आपले स्थान अबाधित ठेवून आहे. पेणच्या पर्यावरण क्षेत्रातील सावरसई ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा गेली २५ वर्षे अबाधित आहे. सामाजिक बांधिलकी, गावची एकता अखंडता कायम ठेवीत पाच दिवसांच्या गणरायांचे गावकरी विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करतात, तेही शांतता व उत्सवाचे पावित्र्य राखून.
पेण-खोपोली रस्त्यावर वसलेले सावरसई गाव. या गावाची तरुणाई, महिला मंडळ, आदिवासी समाज या सर्वांना एकत्रित घेऊन उत्सवाची परंपरा कायम राखल्याने गावाचा एकच गणपती म्हणून उत्सवाच्या पाच दिवस सबंध गावकरी उत्सवात आनंदाने सहभागी होतात. सावरसई ग्रामपंचायतीने गावच्या सांघिक शक्तीच्या जोरावर शासनाची डझनभर पारितोषिके याशिवाय सामाजिक संस्थांनीसुद्धा या गावाला आदर्श गाव म्हणून गौरविले आहे. सध्या युवा पिढीच्या हाती उत्सवाची जबाबदारी असून महिला, युवा, युवती व ज्येष्ठांच्या विचारांच्या आदान प्रदानातून उत्सवाचे नियोजन होते. सकाळी श्री आरती, प्रसाद, दुपारी स्थानिक कलाकारांची नाच गाणी, यात महिलांच्या गणपतीवर आधारित आदिवासी समाजाची लोकशक्ती, एकच बाप्पा असल्याने रात्री उत्सव सभागृहात गावकी जमा होते.
इच्छाशक्ती, एकमेकांप्रती आदरभाव व गाव विकासाच्या संकल्पनेला गणेशाचा आशीर्वाद मिळतो. युवाशक्तीचे योगेश दिवेकर, मार्गदर्शक नीळकंठ दिवेकर, उपसरपंच सुरेश पाटील, चंद्रकांत दिवेकर, भगवान सावंत, महिला मंडळाच्या सारिका दिवेकर व सामाजिक राजकीय क्षेत्रातील गावचे प्रस्थ महादेव दिवेकर या सर्वांनी गाव आणि गावाचे गावपण राखले आहे.

Web Title: Savasarai village's 'One village one Ganpati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.