शाळांची घंटा वाजणार, मात्र व्यवस्थापनांना फुटणार घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:47 AM2020-11-19T02:47:08+5:302020-11-19T02:47:18+5:30
काेराेना नियमांचे उल्लंघन झाल्यास हातावर भेटणार छडी
आविष्कार देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : काेराेनाच्या नियमांचे पालन करताना दरराेज किमान दाेन हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड शाळांना बसणार आहे. काेराेनाचे नियम किती दिवस राहणार आहेत, याची माहिची काेणालाच नाही. त्यामुळे हे असेच सुरू राहिल्यास लाखाे रुपयांचा फटका शाळा व्यवस्थापनांना बसणार असल्याचे चित्र आहे. काेराेना नियमांच्या पालनामध्ये काही त्रुटी राहिल्यास सरकारकडून नियमांची छडी हातावर बसणार असल्याने शाळा व्यवस्थापन हवालदिल झाले आहेत.
काेराेनाच्या जागतिक महामारीमुळे अवघ्या जगाला चांगलाच माेठा तडाखा बसला आहे. लाखाे नागरिकांचा यामध्ये बळी गेला आहे. त्यामुळे काेराेना विषाणूचा धसका सर्वांनीच घेतला हाेता. काेराेनापासून वाचविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध स्तरांवर उपाययाेजना केल्या.
गेल्या काही दिवांसापासून काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताना दिसत आहे. याच कारणाने विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार, मिशन बिगेन अगेन अंतर्गंत टप्प्यप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात येत आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. मात्र, आता काेराेनाचा कमी झालेला प्रभाव पाहता, सरकारने २३ नाेव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना काही अटी-शर्तींचे पालन करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.
पहिल्या टप्प्यातच २५ हजारांचा खर्च
शाळा सुरू करण्याआधी आणि नंतर शाळेतील वर्ग सॅनिटाइझ करणे बंधणकारक आहे, विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गनचा वापर करावा लागणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातच किमान २५ हजार रुपयांचा खर्च हाेणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरराेज किमान दाेन हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. अद्यापही फी जमा झालेली नाही, तसेच हा खर्च विद्यार्थ्यांच्या माथीही मारता येणार नाही. त्यामुळे हा खर्च शाळा व्यवस्थापनांना करावा लागणार असल्याने आर्थिक फटका बसणार आहे.
सरकारने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी काेराेना संपलेला नाही. यासाठी सरकारने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन करणे बंधणकारक आहे.
- भाऊसाहेब थाेरात,
शिक्षणाधिकारी, रायगड