स्कूल बसची एनएमएमटीला धडक

By admin | Published: November 24, 2015 02:01 AM2015-11-24T02:01:57+5:302015-11-24T02:01:57+5:30

सेंट झेवियर्स शाळेची स्कूल बस समोरच्या बसला धडकल्याने अपघात झाल्याची घटना सोमवारी ठाणे-बेलापूर मार्गावर घडली

School Bus hit NMMT | स्कूल बसची एनएमएमटीला धडक

स्कूल बसची एनएमएमटीला धडक

Next

नवी मुंबई : सेंट झेवियर्स शाळेची स्कूल बस समोरच्या बसला धडकल्याने अपघात झाल्याची घटना सोमवारी ठाणे - बेलापूर मार्गावर घडली. या घटनेत एका रिक्षा चालकासह एका विद्यार्थ्याला दुखापत झाली आहे. स्कूल बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेवून जात असताना हा अपघात झाला. ठाणे - बेलापूर मार्गावर भारत बिजलीलगत स्कूल बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही बस समोरून चाललेल्या एनएमएमटीला पाठीमागून धडकली. यानंतर तिथूनच चाललेल्या रिक्षालाही बसची धडक बसल्याने रिक्षाही रस्त्याबाहेर ढकलली गेली. या अपघातात सुदैवाने थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. स्कूल बस समोरच्या बसवर धडकल्याने बसमधील एका विद्यार्थ्याला दुखापत झाली असून इतर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर रिक्षाचालक रहिम खान हा देखील जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातामध्ये स्कूल बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अपघाताचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले. स्कूल बसच्या सुरक्षेचा प्रश्न यापूर्वीही चर्चेचा विषय बनलेला आहे. काही दिवसांपूर्वीच नेरुळ येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या स्कूल बसला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र रात्रीच्या वेळी बस मोकळ्या जागेत उभी असताना ही घटना घडल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली होती. (प्रतिनिधी)

Web Title: School Bus hit NMMT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.