शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बांधकाम मजुरांच्या मुलांची शाळा आता रविवारी देखील भरणार

By admin | Published: April 04, 2016 2:12 AM

बांधकाम मजुरांच्या कामाच्या वेळा, सतत बदलणारे ठिकाण, उघड्यावरील संसार अशा अनेक समस्यांमुळे त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण मात्र अर्ध्यावरच तुटते तर काहींना मात्र शाळेची पायरी देखील

प्राची सोनवणे,  नवी मुंबईबांधकाम मजुरांच्या कामाच्या वेळा, सतत बदलणारे ठिकाण, उघड्यावरील संसार अशा अनेक समस्यांमुळे त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण मात्र अर्ध्यावरच तुटते तर काहींना मात्र शाळेची पायरी देखील चढायला मिळत नाही. अशा मुलांसाठी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन रविवारी शाळा भरविण्याचा उपक्रम बेलापूरच्या समाजसेविका सुप्रभा रावराणे या राबवित आहेत. बांधकाम मजुरांच्या मुलांना नृत्य, संगीत, कला,कॅलिग्राफी, चित्रकला, नाटक, हस्तकला, हॉकी,व्हॉलीबॉल अशा विविध कला तसेच क्रीडाविषयाचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. बेलापूर सेक्टर १५ येथे सुरू असलेले इमारतीचे बांधकाम, पामबीच मार्गावर सुरू असलेल्या नवीन प्रकल्पांचे बांधकाम, सानपाडा, नेरुळ, पनवेलमधील जनकल्याण आश्रम तसेच मुंबईतील धोबीघाट अशा अनेक परिसरात ही शाळा भरविली जाणार आहे. समाजसेविका सुप्रभा यांच्या वतीने गेली कित्येक वर्षे नवी मुंबईतील विविध भागात साक्षरतेविषयी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दररोज संध्याकाळी शाळा भरवून शहरातल्या बांधकाम मजुरांच्या मुलांना शिकवणीचे काम रावराणे यांच्यामार्फत केले जात आहे. या मुलांना लागणारे अभ्यासाचे साहित्य इच्छुक स्वयंसेवकांकडून मदत म्हणून दिले जाते. या मुलांबरोबरच त्यांच्या घरातील महिलावर्गालाही स्वयंरोजगाराचे धडे दिले जात असून कागदी पिशव्या तयार करणे, टाकाऊपासून टिकाऊ आदींचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तरुण स्वयंसेवकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले जाते, सण-उत्सव साजरा केला जातो. शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कित्येक वेळा तिथल्या लोकांशी लढावे लागते, त्यांचा सामना करावा लागतो तरी मात्र न डगमगता या मोठ्या जिद्दीने काम सुरू आहे. सुप्रभा सारख्या या आधुनिक सावित्रीचे काम आज शहरात दूरवर पसरले असून अनेक शेकडो मुलांना साक्षर केले आहे.