नवी मुंबई : महापालिका शाळेतील मुलांनीही दहावीच्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. १७ विद्यालयांचा निकाल ९५.४५ टक्के लागला आहे. सानपाडा शाळेतील पूजा राकेश यादव हिने ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत देता यावे यासाठी महापालिकेने शहरात १७ माध्यमिक विद्यालये सुरू केली आहेत. वर्षनिहाय पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या परीक्षेला १४७५ विद्यार्थी बसले होते. १७ शाळांपैकी शिरवणे, करावे, वाशी, दिवाळे व महापे या पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सानपाडा माध्यमिक शाळेतील पूजा राकेश यादव हिने ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोपरखैरणेमधील राजश्री सोपान चिकणे हिने ९१.२० व सय्यद अहमद रजा इकबाल याने ९१ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. पालिका शाळांचा निकाल सातत्याने वाढत आहे. २०१२ - १३ मध्ये ७ शाळा होत्या. तेव्हा शाळेचा निकाल ९२.८८ टक्के लागला होता. २०१३ - १४ मध्ये १२ शाळा होत्या. शाळेचा निकाल ९५.६० टक्के होता. यावर्षी चार शाळा वाढल्या आहेत. महापालिका शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जे. डी. सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगीरे, ईटीसी केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी अभिनंदन केले आहे. ईटीसी केंद्राचा १०० टक्के निकालमहापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील सर्व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. प्रतीक केदार याने ८१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. च्जस्मीत कौर हिने इंग्रजी माध्यमातून ७५ टक्के, आकाश देवकर याने उच्च पातळीच्या विषयांमध्ये ७० टक्के, नीलम खोसे ७८, प्रसाद यादव ७७, अनघा खरात ६८ टक्के गुण मिळविले आहेत.
पालिका शाळेचे विद्यार्थी हुशार
By admin | Published: June 09, 2015 1:27 AM