शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

फी भरण्यासाठी शाळांचे पालकांना आवाहन, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:41 AM

कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांवर आर्थिक संकट आल्याने फीसाठी शाळांनी तगादा न लावण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.

नवी मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांवर आर्थिक संकट आल्याने फीसाठी शाळांनी तगादा न लावण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. आता शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षा सुरू होत असल्याने पालकांनी संपूर्ण वर्षाची शालेय फी भरण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु अनेक पालकांची आर्थिक स्थिती अद्यापही सुधारली नसल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. (Schools appeal to parents to pay fees, an atmosphere of concern among parents)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता.  या काळात शाळा, महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करण्यात आली नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन काळात अनेक पालकांचे रोजगार बंद झाले असून, व्यवसायदेखील ठप्प झाले होते. या काळात शाळा प्रशासनाने फीसाठी पालकांकडे तगादा न लावण्याचे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.  

आता शैक्षणिक वर्ष जवळपास पूर्ण झाले असून, शहरातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वार्षिक परीक्षादेखील झाल्या आहेत; तर काही शाळांच्या परीक्षा सुरू होणार असून, पालकांनी फी भरावी, यासाठी शाळांच्या माध्यमातून आवाहन केले जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी