नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

By नारायण जाधव | Published: July 8, 2024 09:27 PM2024-07-08T21:27:20+5:302024-07-08T21:27:52+5:30

भारतीय हवामान खात्यातर्फे उद्याही (९ जुलै) अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा

Schools holiday in Navi Mumbai on Tuesday; Municipal commissioner took the decision due to heavy rain | नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने महामुंबईतील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने रस्ते व रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजून नागरिकांचे प्रचंड हाल झाले. भारतीय हवामान खात्याने ९ जुलै रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या  इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा मंगळवार, ९ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्यात येतील, असे आदेश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी निर्गमित केले आहेत.

पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय

तसेच, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांनाही मंगळवारी (९ जुलै) सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी याबाबतचे स्वतंत्र आदेश सोमवारी रात्री जारी केले.

Web Title: Schools holiday in Navi Mumbai on Tuesday; Municipal commissioner took the decision due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.