नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने महामुंबईतील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने रस्ते व रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजून नागरिकांचे प्रचंड हाल झाले. भारतीय हवामान खात्याने ९ जुलै रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा मंगळवार, ९ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्यात येतील, असे आदेश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी निर्गमित केले आहेत.
पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
तसेच, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांनाही मंगळवारी (९ जुलै) सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी याबाबतचे स्वतंत्र आदेश सोमवारी रात्री जारी केले.