सायन्स विद्यार्थी, पालकांसाठी बुधवारी सेमिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:38 AM2018-01-20T01:38:58+5:302018-01-20T01:39:04+5:30
वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते.
नवी मुंबई : वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते. या अनुषंगाने ११ वी, १२ वीच्या सायन्स विद्यार्थी व पालकांना करिअर संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल व धैर्य उंचाविण्यासाठी चेन्नईतील ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’ प्रस्तुत ‘यशाचे मंत्र’ या सेमिनारचे आयोजन बुधवारी (दि. २४) केले आहे. जीवन विद्या मिशन हॉल, प्लॉट नं. २४ सेक्टर ६, कामोठे नवी मुंबई दुपारी ३:३० वा. हा सेमिनार होणार आहे.
आज केवळ वैद्यकीय अधिकारी, अभियंता एवढ्यापुरतेच करिअर मर्यादित राहिलेले नाही. करिअरच्या अनेक नव्या वाटा, संधी विद्यार्थ्यांना खुणावीत आहेत. विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर आणि जीवन घडविण्याचा मंत्र या सेमिनारमध्ये मिळणार आहे. यामध्ये सुप्रसिद्घ लेखक सुदीप नगरकर आपल्या आवडीनुसार क्षेत्राची निवड कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
तसेच एसआरएम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि आॅॅटोमोबाईल इंजिनिअरिग्ांचे हेड डॉ. एम. लिनस मार्टिन व डॉ. निमय मिश्रा सहप्राध्यापक केमिस्ट्री हे मार्गदर्शन करणार आहेत.
या सेमिनारमध्ये उज्ज्वल भवितव्याची उत्तरे मिळणार आहेत. या सेमिनारच्या अगोदर विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर सेमिनार होईल. त्यानंतर या चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यश मिळविलेल्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे.
तरी ‘यशाचे मंत्र ’या सेमिनारचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ७७३८८७७२२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा होणार असून, यासाठी एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बुद्धिमता चाचणी, सामान्यज्ञान (जनरल नॉलेज) ही चाचणी परीक्षा दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक एक टॅब, द्वितीय व तृतीय पारितोषिक मोबाईल आणि उत्तेजनार्थ दोन पेन ड्राईव्ह अशी भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.
करिअर घडविणारा उपयुक्त सेमिनार : ११ वी, १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ‘पुढे काय ?’ हा पडलेला प्रश्न सतावत असतो. त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो. अशावेळी आवश्यकता असते प्रोत्साहनाची व सुयोग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’चा हा सेमिनार उपयुक्त ठरणार आहे.