शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

प्रभागवार मतदान यंत्रे सील

By admin | Published: May 18, 2017 4:21 AM

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणारी मतदान यंत्रे उमेदवारांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. आता ही मशिन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणारी मतदान यंत्रे उमेदवारांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. आता ही मशिन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार असून २३ मे रोजी बाहेर काढून मतदार केंद्रावर रवाना करण्यात येतील, अशी माहिती प्रभाग १७ ते २० चे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. मतदान यंत्रामध्ये गडबड करता येते असा आरोप सध्या अनेक राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. याबाबत न्यायालयात ही तक्रार करण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात येणारी यंत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यावर बुधवार, १७ मे रोजी सकाळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर त्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या शंकांचे समाधान करून ती सील करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून दारू आणल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत आढळून आले आहे. निवडणुकीत मतदारांना वळवण्यासाठी व आमिष दाखविण्यासाठी विविध प्रयत्न काही जणांकडून केले जातात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दारू, पैसे वाटपाबरोबर वेगवेगळी आमिषे दाखविणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मद्य आणि काळ्या पैशावर नियंत्रणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्राप्तिकर विभाग आणि पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यासाठी नाके तयार करण्यात आले आहेत.पनवेल महापालिका निवडणुकीच्या काळात परिसरात दारू व मटणाच्या पार्ट्या रंगत आहेत. कार्यकर्त्यांना जेवणावळी, दारूच्या पार्ट्या, तर मतदारांना भेटवस्तूंचे वाटप, सोसायट्यांची करून दिलेली कामे, मतदानासाठी थेट पैसे, वीज, फोन बिल भरणे असे प्रकार पनवेल परिसरात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.मतदानाच्या मशिनमध्ये घोटाळा करणे शक्य नाही, कारण ही मशिन कोठून येणार हे कोणालाच माहीत नसते. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे नाव कोणत्या मतदान यंत्रावर किती क्र मांकावर असेल हे आधी माहीत नसते. मतदान यंत्रे आल्यावर सील करून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतात. मतदान केंद्रावर पुन्हा प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यामुळे त्यामध्ये गडबड करणे शक्य नाही.- ज्ञानेश्वर खुटवड, निवडणूक निर्णय अधिकारी