सीजन्स २०१९ महोत्सव जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:31 PM2019-01-29T23:31:23+5:302019-01-29T23:31:44+5:30

विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद

Season of 2019 Festival | सीजन्स २०१९ महोत्सव जल्लोषात

सीजन्स २०१९ महोत्सव जल्लोषात

googlenewsNext

नवी मुंबई : नेरुळमधील एसआयईएस महाविद्यालयात आर्ट्स, विज्ञान आणि कॉमर्स शाखेच्या वतीने सीझन्स २०१९ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीतील उपजत कलागुणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने या वर्षी इरा आॅफ डिस्कव्हरीज या संकल्पनेवर आधारित कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘लोकमत’ हे या कार्यक्र माचे माध्यम प्रायोजक होते.

या महोत्सवाकरिता विद्यार्थ्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून मेहनत घेतली, ज्यामुळे हा कार्यक्र म यशस्वी झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद वैद्य यांनी सांगत समाधान व्यक्त केले. या कार्यक्र माच्या निमित्ताने सोल गायन, पेंट बॉल लढा, मेगा डान्स, फॅशन शो आदी कार्यक्र मांच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थ्यांना आपल्यातील कला दर्शविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. महाविद्यालयात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांचे अनुसरण करून सीजन्स २०१९ या कार्यक्र माच्या समितीने सुमारे ३५० स्वयंसेवकांच्या मदतीने एक उत्साही मैफील आयोजित केली. त्यात फराह अख्तर आणि त्याची टीम नवी मुंबईत पहिल्यांदाच आली. अष्टपैलू गायकांनी संपूर्ण कार्यक्र माला चमकदार कामगिरीसह प्रकाशित केले. या कार्यक्र मासाठी महाविद्यालय संगीतप्रेमींनी भरले होते. या कार्यक्रमाच्या प्रतिसादामुळे आनंद झाल्याची भावना रोहण हरकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Season of 2019 Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.