शेतकरी संपाचा दुस-या दिवशी मुंबईवर परिणाम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 11:25 AM2018-06-02T11:25:34+5:302018-06-02T11:25:34+5:30
सकाळी दहा वाजेपर्यंत भाजीपाला फळांची आवक सुरळीत सुरू होती.
नवी मुंबई- राज्यातील शेतकरी संपाचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर फारसा परिणाम झालेला नाही. सकाळी दहा वाजेपर्यंत भाजीपाला फळांची आवक सुरळीत सुरू होती.
भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल 544 वाहनांची आवक झाली. सातारा, सांगली,पुणे,नाशिक परिसरातूनही भाजीपाल्याची आवक झाली आहे.हिमाचल प्रदेशमधून मिरची व वाटाण्याची आली झाली आहे. कर्नाटकमधून कोबी, गुजरातवरून कोबी ,तोंडली व इतर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. आंध्रप्रदेश मधून शेवग्यासह कैरी विक्रीसाठी आली आहे. सलग दुस-या दिवशीही संपाचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापा-यांनी दिली.
फळ मार्केट मध्ये दहा वाजेपर्यंत 360 वाहनांची आवक झाली आहे.कोकण व कर्नाटक मधून आंब्याची आवक झाली आहे. कांदा 81 ट्रक टेंपो, बटाटा 46 व लसूनच्या दहा गाड्यांची आवक झाली असल्याची माहिती बाजारसमितीचा प्रशासनाने दिली.