सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात
By admin | Published: January 29, 2017 02:30 AM2017-01-29T02:30:57+5:302017-01-29T02:30:57+5:30
खारघरमधील सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरु वात होणार आहे. लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर उभारलेले सेंट्रल पार्क हे सर्वांच्याच आकर्षणाचे
- वैभव गायकर, पनवेल
खारघरमधील सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरु वात होणार आहे. लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर उभारलेले सेंट्रल पार्क हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. सिडकोने २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. सेक्टर २३ पहिला टप्पा व सेक्टर २४, २५ मध्ये दुसरा टप्पा असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. सुमारे २०० एकर परिसरात नियोजित असलेल्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरु वात होणार आहे. याकरिता टेंडर प्रक्रि येची तयारी सिडकोने पूर्ण केली आहे.
सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्यात चिल्ड्रन पार्क, अॅम्पीथिएटर, हरित क्षेत्र, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पार्क, हस्त मुद्रा पार्क, थीम पार्क, फूड प्लाझा, वाहनतळ आदींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या प्रकल्पाला पाहण्यासाठी नवी मुंबई, मुंबई परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात, तसेच विशेष म्हणजे अनेक शालेय सहलींचे देखील याठिकाणी आयोजन केले जाते. २०० एकरपैकी जवळजवळ १०० एकर परिसरात या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. याठिकाणी प्रवेश देखील विनामूल्य असल्याने सतत नागरिकांची वर्दळ याठिकाणी असते. सुमारे १०० कोटी रु पये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आले आहे. लवकरच सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरु वात केली जाणार आहे. त्यापूर्वी सिडकोने उभारलेले हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक असा प्रकल्प आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरु वात होणार आहे. त्या दुसऱ्या टप्प्यात म्युझिकल फाऊंटेन, अॅम्युझमेंट पार्क, किराइड्स, फ्लाइंग स्कूटर, वॉटर स्लाईड्स, वाईल्ड माऊस, रिवर, रिटेल शॉप, रेस्टॉरंट , गो कार्टिंग आदींचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीला ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील चिल्ड्रन पार्क, अॅम्पी थिएटर, म्युझिकल इन्स्ट्र्युमेंट पार्क हे आकर्षक असे ठिकाण आहे. याठिकाणी साडेसहा हजार जण एकत्र बसतील एवढी जागा आहे. याठिकाणी योग तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याकरिता एप्रिल महिन्यापर्यंत टेंडर काढण्यात येणार आहे. १८ हेक्टरपर्यंत अॅम्युझमेंट पार्क डेव्हलप केलेल्या व १०० कोटीपर्यंत कामे घेतलेल्या कंत्राटदार कंपनीला या दुसऱ्या टप्प्याच्या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार आहे.
दोन वर्षात हा टप्पा पूर्ण करण्याची मुदत असणार आहे. यावेळी अंदाजित ४०० कोटी खर्च येणार असल्याची माहिती सेंंट्रल पार्कचे कार्यकारी अधिकारी रामेश्वर कुसाळकर यांनी दिली.