शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

ग्रीन टॅक्स न भरल्यास वाहनांवर येणार जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:11 AM

जुनी वाहने रडारवर; नवी मुंबई आरटीओचे वाहनधारकांना आवाहन

नवी मुंबई : १५ वर्षांहून जुन्या वाहनांना ग्रीन टॅक्स भरणे बंधनकारक आहे. शहरात अशा वाहनांची संख्या मोठी आहे. अनेकांनी हा टॅक्स भरलेला नाही. या थकीत टॅक्सची वसुली करण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालया(आरटीओ)ने धडक मोहीम हाती घेतली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ग्रीन टॅक्स न भरणाऱ्या जुन्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे संकेत आरटीओ अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिले आहेत. त्यामुळे ग्रीन टॅक्स न भरता राजरोसपणे जुनी वाहने चालविणाºया वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.मागील दीड वर्षापासून वाहन नोंदणीत कमालीची घट झाली आहे. त्याचा फटका आरटीओच्या महसूल वसुलीला बसला आहे. वार्षिक उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठणेही या कार्यालयांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने आरटीओने आता कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून १५ वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या वाहनांकडून ग्रीन टॅक्स वसूल करण्याची मोहीम आरटीओने होती घेतली आहे. वाहन नोंदणी झाल्याच्या १५ वर्षांनंतर (आरटीओ टॅक्स संपल्यानंतर) खासगी वाहनधारकांना सदर वाहन रस्त्यावर चालवायचे असल्यास शासनाला ग्रीन टॅक्स भरावा लागतो. मात्र, ९० टक्के खासगी वाहनचालकांना ग्रीन टॅक्स काय असतो, याचीदेखील कल्पना नसते. टी परमिट असलेल्या वाहनचालकांमध्ये ग्रीन टॅक्सबाबत जागरूकता आहे. कारण ग्रीन टॅक्स न भरल्यास त्यांच्या वाहनाला पुढील व्यावसायिक परवाना मिळण्यास अडचणी होतात; परंतु खासगी मोटारसायकल अथवा चारचाकी वाहनधारकांना या टॅक्सबाबत कोणतीही माहिती नाही. अशा वाहनधारकांनी या टॅक्सबाबत माहिती करून घेण्याचे आवाहन आरटीओने केले आहे. ग्रीन टॅक्स न भरता वाहने रस्त्यावर चालवत असल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहन जप्त करण्याची कारवाई आरटीओ अधिकारी करू शकतात. त्यामुळे सदर वाहन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी ३० नोव्हेंबरपूर्वी ग्रीन टॅक्सचा भरणा करावा, असे आवाहन आरटीओने केले आहे.१ डिसेंबरपासून धडक मोहीम१५ वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या व ग्रीन टॅक्सचा भरणा न केलेल्या वाहनांवर १ डिसेंबरपासून विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई केली जाणार आहे. याअंतर्गत थेट वाहनांवर जप्ती आणली जाणार आहे. दिलेल्या मुदतीत ग्रीन टॅक्सचा भरणा न केल्यास संबंधित वाहनधारकांकडून दोन टक्के व्याजासह टॅक्सची संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे.