नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले ८ सदस्य समितीमधून निवृत्त झाले आहेत. याठिकाणी इतर ८ नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी ३0 एप्रिल रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महापालिकेत विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये सदस्यांची निवड करण्यात येते. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेले सदस्य समितीमधून निवृत्त होऊन इतर सदस्यांना संधी देण्यात येते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश कुलकर्णी, अशोक गावडे, देविदास हांडे पाटील, शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर, नामदेव भगत, शिवराम पाटील, दीपाली सकपाळ, ऋ चा पाटील असे एकूण आठ सदस्य निवृत्त झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या पक्षप्रतोद यांनी महापौरांना सुचविल्याप्रमाणे आठ नवीन सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर जयवंत सुतार यांनी विशेष महासभेत केली. या सदस्यांच्या जागेवर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश मोरे, सलुजा सुतार, रवींद्र इथापे तर शिवसेनेचे नगरसेवक बहादूर बिष्ट, चेतन नाईक, मेघाली राऊत, ज्ञानेश्वर सुतार, आणि सरोज पाटील या आठ नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त सदस्यांचे महापौर सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी आणि इतर सर्व नगरसेवकांनी यांनी अभिनंदन केले.