वर्ल्ड थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पार्थ पाटीलची निवड

By योगेश पिंगळे | Published: September 8, 2023 06:33 PM2023-09-08T18:33:43+5:302023-09-08T18:33:59+5:30

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेतील ...

Selection of Partha Patil for World Thai Boxing Championship | वर्ल्ड थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पार्थ पाटीलची निवड

वर्ल्ड थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पार्थ पाटीलची निवड

googlenewsNext

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेतील इयत्ता १० वीचा विद्यार्थी पार्थ उमाकांत पाटील याने नुकत्याच भुवनेश्वर, ओडिशा येथे झालेल्या १४ व्या नॅशनल थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले असून त्याची निवड ऑक्टोबरमध्ये हैद्राबाद येथे होणाऱ्या वर्ल्ड थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

या अगोदर औरंगाबाद येथे झालेल्या ८ व्या स्टेट थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक तर आसाम येथे झालेल्या ९ व्या थाई बॉक्सिंग फेडरेशन कप मध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. पार्थचे अभिनंदन करताना माजी खासदार आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, रायगड विभागीय कार्यालयाचे पी.आर.ओ बाळासाहेब कारंडे, विद्यालयाच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, पी.टी.शिक्षक हितेश कडू व पालक उमाकांत पाटील आदी उपस्थित होते.

 

Web Title: Selection of Partha Patil for World Thai Boxing Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.