आत्मदहनाचा सूरजच्या नातेवाइकांचा निर्णय कायम

By admin | Published: July 4, 2017 07:06 AM2017-07-04T07:06:47+5:302017-07-04T07:06:47+5:30

जिल्हा रु ग्णालयात मणक्यावरील शस्त्रक्रि येदरम्यान मार्च २०१६मध्ये मृत पावलेल्या सूरज चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्र्यांसमोर

Self-determination of sun-relation relatives continued | आत्मदहनाचा सूरजच्या नातेवाइकांचा निर्णय कायम

आत्मदहनाचा सूरजच्या नातेवाइकांचा निर्णय कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्हा रु ग्णालयात मणक्यावरील शस्त्रक्रि येदरम्यान मार्च २०१६मध्ये मृत पावलेल्या सूरज चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना आत्मदहन करू नये, अशी केलेली विनंती सूरजच्या नातेवाइकांनी धुडाकावून लावली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलिबाग येथील खासगी रुग्णालय चालविणारे डॉ. चंद्रकांत साठे हे शासनाच्या चौकशी अहवालामध्ये दोषी आढळल्याने त्यांची वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द करण्याबाबतही सरकारने आदेश देऊनही आता जिल्हास्तरीय विशेषतज्ज्ञ समिती गठीत करून, डॉ. साठे यांना निर्दोष ठरविल्याने गेले दीड वर्षे न्यायासाठी झगडणाऱ्या मृत सूरजच्या कुटुंबावर सरकारकडून अन्याय आणि प्रचंड दुर्लक्ष होत असल्याची भावना झाली आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री अथवा मंत्री येणार असतील, तर त्यांच्यासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा मृत सूरजच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री कार्यालयासह रायगड जिल्हा प्रशासनास दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना या कुटुंबास चर्चेसाठी बोलावून त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखावे, असे कळविले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी या कुटुंबातील मृताच्या पत्नी शीतल सूरज पाटील, वडील चंद्रकांत शंकर पाटील, आई प्रभावती चंद्रकांत पाटील, भाऊ निकेश चंद्रकांत पाटील, मामा धनंजय पाटील या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्यासोबत चर्चा केली. विशेष म्हणजे, या वेळी मृत सूरज यांचा दीड वर्षांचा मुलगा पियांशू हादेखील उपस्थित होता. आपल्या लहान मुलासोबत आपली बाजू मांडताना शीतल पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. डॉ. अजित गवळी यांनी कुटुंबीयांच्या भावनांशी आपण सहमत असल्याचे सांगितले.
या वेळी या कुटुंबाने दोषी डॉ. चंद्रशेखर साठे यांच्यावर कारवाई करावी. डॉ. साठे यांना सरकारच्या चौकशी समितीने दोषी ठरवूनही त्यांना निर्दोष ठरविणारा जिल्हास्तरीय कमिटीचा अहवाल रद्द करावा, कुटुंबाला सरकारकडून आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, मृताच्या पत्नीस सरकारी सेवेत नोकरी द्यावी. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या चार मागण्यांबाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यावरच आम्ही अलिबाग येथे विविध कार्यक्र मानिमित्त येणाऱ्या मुख्यमंत्री अथवा मंत्री महोदयांसमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा विचार मागे घेऊ, असे लेखी निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले. या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, माजी नगरसेविका आशा वारंगे, प्रदेश काँग्रेस सेवादल सदस्या मोनिका पाटील, शीतल कवळे, सुजाता कोळी, जयश्री गावडे उपस्थित होते.

Web Title: Self-determination of sun-relation relatives continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.