शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

आत्मदहनाचा सूरजच्या नातेवाइकांचा निर्णय कायम

By admin | Published: July 04, 2017 7:06 AM

जिल्हा रु ग्णालयात मणक्यावरील शस्त्रक्रि येदरम्यान मार्च २०१६मध्ये मृत पावलेल्या सूरज चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्र्यांसमोर

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्हा रु ग्णालयात मणक्यावरील शस्त्रक्रि येदरम्यान मार्च २०१६मध्ये मृत पावलेल्या सूरज चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना आत्मदहन करू नये, अशी केलेली विनंती सूरजच्या नातेवाइकांनी धुडाकावून लावली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अलिबाग येथील खासगी रुग्णालय चालविणारे डॉ. चंद्रकांत साठे हे शासनाच्या चौकशी अहवालामध्ये दोषी आढळल्याने त्यांची वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द करण्याबाबतही सरकारने आदेश देऊनही आता जिल्हास्तरीय विशेषतज्ज्ञ समिती गठीत करून, डॉ. साठे यांना निर्दोष ठरविल्याने गेले दीड वर्षे न्यायासाठी झगडणाऱ्या मृत सूरजच्या कुटुंबावर सरकारकडून अन्याय आणि प्रचंड दुर्लक्ष होत असल्याची भावना झाली आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री अथवा मंत्री येणार असतील, तर त्यांच्यासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा मृत सूरजच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री कार्यालयासह रायगड जिल्हा प्रशासनास दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना या कुटुंबास चर्चेसाठी बोलावून त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखावे, असे कळविले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी या कुटुंबातील मृताच्या पत्नी शीतल सूरज पाटील, वडील चंद्रकांत शंकर पाटील, आई प्रभावती चंद्रकांत पाटील, भाऊ निकेश चंद्रकांत पाटील, मामा धनंजय पाटील या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्यासोबत चर्चा केली. विशेष म्हणजे, या वेळी मृत सूरज यांचा दीड वर्षांचा मुलगा पियांशू हादेखील उपस्थित होता. आपल्या लहान मुलासोबत आपली बाजू मांडताना शीतल पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. डॉ. अजित गवळी यांनी कुटुंबीयांच्या भावनांशी आपण सहमत असल्याचे सांगितले.या वेळी या कुटुंबाने दोषी डॉ. चंद्रशेखर साठे यांच्यावर कारवाई करावी. डॉ. साठे यांना सरकारच्या चौकशी समितीने दोषी ठरवूनही त्यांना निर्दोष ठरविणारा जिल्हास्तरीय कमिटीचा अहवाल रद्द करावा, कुटुंबाला सरकारकडून आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, मृताच्या पत्नीस सरकारी सेवेत नोकरी द्यावी. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या चार मागण्यांबाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यावरच आम्ही अलिबाग येथे विविध कार्यक्र मानिमित्त येणाऱ्या मुख्यमंत्री अथवा मंत्री महोदयांसमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा विचार मागे घेऊ, असे लेखी निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले. या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, माजी नगरसेविका आशा वारंगे, प्रदेश काँग्रेस सेवादल सदस्या मोनिका पाटील, शीतल कवळे, सुजाता कोळी, जयश्री गावडे उपस्थित होते.