घारापुरी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचासह आठही उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:01 PM2022-12-02T21:01:04+5:302022-12-02T21:01:14+5:30

भाजपला जोरदार धक्का, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषाचे वातावरण.

Sena saffron on Gharapuri Gram Panchayat: Uddhav Balasaheb Thackeray's sarpanch and eight candidates unopposed | घारापुरी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचासह आठही उमेदवार बिनविरोध

घारापुरी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचासह आठही उमेदवार बिनविरोध

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण:  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सेना व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या झंझावातापुढे भाजपचे स्थानिक नेतेही हतबल ठरले. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही एकही उमेदवार सापडला नसल्याने अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घारापुरी ग्रामपंचायतीवर सेनाचा भगवा निविर्वाद, बिनविरोध फडकल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच घारापुरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी भाजप आमदार महेश बालदी, माजी सरपंच राजेंद्र पडते यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थकांनी केली होती.निवडूकीच्या पार्श्वभूमीवर पुस्तिकाही प्रसिद्ध केली होती.उमेदवारांची चाचपणीही करुन निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली होती.मात्र कोरोनाची दोन वर्षं वगळता तीन वर्षांत सरपंच बळीराम ठाकूर यांनी सेना व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या गावाच्या विकासकामांच्या झंझावातापुढे भाजपचे स्थानिक नेते हतबल ठरले.

सेना उमेदवारांपुढे निभाव लागणार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजपने तयार केलेल्यांपैकी एकही उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आला नाही.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात भाजप गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठही उमेदवार  बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होण्याची औपचारिकताच उरली आहे.दरम्यान आठही सदस्यांनी जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांची भेट घेऊन जल्लोष केला.या बिनविरोध निवडणूकीमुळे भाजप आमदार महेश बालदी यांना धक्का बसला आहे.

ग्रामपंचायत घारापुरी सार्वत्रिक निवडणूक २०२२

थेट सरपंच उमेदवार महिला सौ.मीना मुकेश भोईर

प्रभाग क्रमांक १

१) बळीराम पद्माकर ठाकुर.

२)सौ.हेमाली रुपेश म्हात्रे.

३) सौ.अरुणा कमलाकर घरत. 

Web Title: Sena saffron on Gharapuri Gram Panchayat: Uddhav Balasaheb Thackeray's sarpanch and eight candidates unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.