शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 4:13 AM

संततधारेने कोसळणाºया पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले.

नवी मुंबई : संततधारेने कोसळणाºया पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले. महापालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनासाठी त्या त्या विभागांत विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.शुक्रवारी गणेशाचे घराघरांत वाजतगाजत आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतला पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवार सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे गणेशभक्तांची काही प्रमाणात गैरसोय झाली. असे असले तरी चिंब पावसाची तमा न बाळगता, भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. शनिवारी दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाशी तलाव, कोपरखैरणे, कोपरी तसेच घणसोली गोठीवली, ऐरोली, सानपाडा, नेरुळ, सीबीडी आदी भागांतील तलावात श्रीच्या मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात व ‘गणपती बाप्पा मोºया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात विसर्जन करण्यात आले.पनवेलमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. विसर्जनासाठी शहरातील तलावात तर ग्रामीण भागात नदीमध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली होती. पुढच्या वर्षी लवकर या... असे आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपतीचे शुक्र वारी आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी व्यक्त केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करीत दीड दिवसांच्या बाप्पाला हजारो भाविकांनी निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात शनिवारी विसर्जन करण्यात आले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा फटका विसर्जन कार्याला बसला. विसर्जनाला जाणाºया गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. विशेषत: ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, गोठीवली, कोपरी या भागांतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने खड्ड्यांत पाणी साचून त्याचे डबक्यात रूपांतर झाले आहे. अशा खड्डेमय व जलमय रस्त्यावरून श्रीच्या विसर्जनाची मिरवणूक काढताना भक्तांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.