सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:04 AM2018-12-30T00:04:17+5:302018-12-30T00:13:09+5:30

सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही.

Senior citizen's suicide in Sanpada | सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

Next

 

नवी मुंबई : सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही. या प्रकरणी त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद सानपाडा पोलीसठाण्यात करण्यात आली आहे.
अरुण काशीनाथ खरगोनकर (५८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सानपाडा येथे पत्नी अनुभा (५३) यांच्यासोबत राहायला होते. त्यांची मुले नोकरी निमित्ताने विदेशात स्थायिक आहेत. गुरुवारी अरुण यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. काही कामानिमित्ताने पत्नी घराबाहेर गेली असताना हा प्रकार घडला. छताच्या कडीला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतलेला होता. घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी अथवा इतर काही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण उघड होऊ शकलेले नाही.
त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद सानपाडा पोलीसठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Senior citizen's suicide in Sanpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.