प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचे साखळी उपोषण सुरूच,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:13 AM2017-11-27T07:13:07+5:302017-11-27T07:13:19+5:30

सिडको प्रशासन व ठेकेदार स्थानिक विमानतळ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व प्रमुख ठेकेदाराविरोधात

 The series of hunger strike started by the contractor, | प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचे साखळी उपोषण सुरूच,

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचे साखळी उपोषण सुरूच,

Next

पनवेल : सिडको प्रशासन व ठेकेदार स्थानिक विमानतळ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व प्रमुख ठेकेदाराविरोधात शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनावर कोणताही तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्त लॉरीमालक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून पुकारलेले हे उपोषण तिसºया दिवशीही सुरूच होते. दरम्यान, मागण्या लवकर मान्य न केल्यास विमानतळ क्षेत्रातील सर्व कामे बंद करण्याचा इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत व कामगारनेते महेंद्र घरत यांनीही आपला पाठिंबा या उपोषणकर्त्यांना दर्शविला आहे. दुसºया दिवशी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, शिवसेना आमदार मनोहर भोईर तसेच काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपानेत्यांनी या उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवल्याने या उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तीन दिवस उलटूनही सिडको प्रशासन अथवा मोठ्या ठेकेदारांनी यासंदर्भात उपोषणकर्त्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याने, जसजसे उपोषणाचे दिवस पुढे जातील, तसतसे उपोषणाचे स्वरूप बदलणार आहे. असा इशारा कवी तारेकर या उपोषणकर्त्या ठेकेदाराने दिला आहे.
विमानतळ क्षेत्रात कार्यरत असलेले ३०० डंपर, जेसीबी दुसºया दिवशीही बंद ठेवण्याने विमानतळाचे भरावाचे काम मंदावले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार केला जाणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आमच्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही, तर दि. २९ रोजी दहा गावांतील सर्व स्थानिक विमानतळग्रस्त ठेकेदारांच्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून सिडकोची सर्व कामे बंद पाडू. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिडको व संबंधित ठेकेदार जबाबदार असतील, असेही या वेळी कवी तारेकर यांनी स्पष्ट केले.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या
सिडको प्रशासनाने १६ सप्टेंबर २0१७ रोजी बैठक घेऊन डंपर, पोकलेन यांचे प्रतिफेरीचे दर निश्चित करून दिले होते. त्यानुसार पोकलेन प्रतितास १६५0 (बकेट ), पोकलेन १९५0 ( ब्रेकर ), तर डंपर प्रतिफेरी ६५0 रु पये २ कि.मी.पर्यंत असा दर ठरला होता. १५ नोंव्हेंबरपर्यंत या दराप्रमाणे पेमेंट करण्यात आले. त्यानंतर नवीन दर ठरविण्यासाठी ठेकेदार मुख्य कंत्राटदारांकडे गेले असता नाममात्र दरात काम करण्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याला विरोध करीत ठेकेदारांनी काम बंद करून शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Web Title:  The series of hunger strike started by the contractor,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.