शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

रखडलेल्या पगारासंदर्भात निर्णयासाठी समिती स्थापन

By admin | Published: February 14, 2017 4:26 AM

पनवेल शहर महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ पासून अस्तित्वात आली. पालिकेत तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींचा समावेश

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ पासून अस्तित्वात आली. पालिकेत तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या ग्रामपंचायतींच्या एकूण ३८४ कामगारांचे पगार जवळजवळ पाच महिन्यांपासून रखडले आहेत. काही ग्रामपंचायतीत नोकरभरतीत अनियमितता आढळून आल्याने पनवेल महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात स्थगिती दिली आहे. हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असून पगारासंदर्भात निर्णयासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. कामगारांच्या रखडलेल्या पगारामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ग्रामपंचायतीत महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी अचानक झालेल्या नोकरभरतीची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पगार काढण्यास स्थगिती दिली होती. मात्र खारघर येथील ‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्र मात खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष गायकर यांनी ३८४ कामगारांच्या रखडलेल्या पगारासंदर्भात आयुक्तांना प्रश्न विचारला असता, त्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगून लवकरच कामगारांना पगार मिळेल, असे सांगितले. सफाई कामगारांसह, प्लंबर, क्लार्क, वाहनचालक, स्वच्छता निरीक्षक, लेखनिक आदींचे पगारही रखडले आहे. काळुंद्रे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात असलेल्या अविनाश म्हात्रे या कामगाराचा नुकताच मृत्यू झाला आहे. याचप्रकारे अनेक कामगारांवर आजारावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नसल्याने यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून पात्र कामगारांना लवकरात लवकर पगार द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)