आद्य क्रांतिकारकाचे स्मारक उभारणार

By admin | Published: August 10, 2015 02:23 AM2015-08-10T02:23:44+5:302015-08-10T02:23:44+5:30

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गावी- शिरढोण येथे त्यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाची उभारणी लवकरच करण्यात येणार आहे.

Setting up the memorial of the First Revolutionary monument | आद्य क्रांतिकारकाचे स्मारक उभारणार

आद्य क्रांतिकारकाचे स्मारक उभारणार

Next

वैभव गायकर, पनवेल
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गावी- शिरढोण येथे त्यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाची उभारणी लवकरच करण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने जिल्हा परिषदेमार्फत हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. फडके यांचा अश्वारूढ पुतळा देखील उभारला जाणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वासुदेव बळवंत फडके यांचा सिंहाचा वाटा आहे. शिरढोण येथे त्यांचा वाडा आहे, मात्र त्याची दुरवस्था होवून तो मोडकळीस आला होता. माजी आमदार विवेक पाटील व पनवेलचे तत्कालीन तहसीलदार संदीप माने यांनी पाठपुरावा करून मोडकळीस आलेला वाडा पुरातत्व विभागाच्या मदतीने पुनर्जीवित केला. यासाठी २ कोटी रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. लाकूड, वाळू , गूळ, चुन्याच्या मिश्रणाने वाड्याची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती. फडके यांच्या मूळ गावी त्यांच्या जीवनावरील इत्थंभूत माहिती देणारे एक वस्तुसंग्रहालय सरकारने उभारावे अशी शिरढोण ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसारच या संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. संग्रहालयात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म, जीवनपट, स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका, कर्तृत्व, चरित्र , वस्ती, आवडी, नातेवाईक, घराची आखणी यावर आधारीत माहिती देण्यात येणार आहे. त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह इतर दहा पुतळ्यांची उभारणी केली जाणार आहे. हे पुतळे उभारण्याची जबाबदारी शिल्पकार अरु ण कारेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार असल्याचे शिल्पकार कारेकर यांनी सांगितले. पुरातत्व विभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी नुकतीच या वाड्याची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संग्रहालय उभारणीसाठी १० लाख रु पयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित ३० लाखांचा निधी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे.

Web Title: Setting up the memorial of the First Revolutionary monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.