शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

सातशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

By admin | Published: February 09, 2017 4:56 AM

यादवनगर व देवीधाम नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. महापालिका व एमआयडीसीने संयुक्तरीत्या ही

नवी मुंबई : यादवनगर व देवीधाम नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. महापालिका व एमआयडीसीने संयुक्तरीत्या ही कारवाई करून त्या ठिकाणच्या सुमारे ६०० झोपड्या, तर १५० हून अधिक दुकाने पाडण्यात आली असून त्यामध्ये भंगाराच्या दुकानांचा सर्वाधिक समावेश आहे. तर येत्या काही दिवसांत शहरातील इतर ठिकाणच्या झोपड्यांवरही बुलडोझर चालवला जाणार आहे.‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमादरम्यान पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यादवनगर येथील अनधिकृत झोपड्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. अतिक्रमणाचा भस्मासुर कुठेतरी थांबला पाहिजे, अशी गरज व्यक्त करत सन २००० नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई अटळ असल्याचाही इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेने हातोडा मारला आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती. यादरम्यान यादवनगर व देवीधाम नगर परिसरातील ७००हून अधिक अनधिकृत झोपड्या व भंगाराची दुकाने पाडण्यात आली. वर्षभरापूर्वीही त्या ठिकाणी कारवाईचा प्रयत्न झाला होता. मात्र, झोपडीधारकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे कारवाई टळली होती; परंतु बुधवारी अत्यंत नियोजनबद्धरीत्या कारवाईला सुरुवात झाल्यामुळे रहिवाशांना विरोधाची संधीच मिळाली नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात झोपड्या पाडण्यात आल्या.त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरातील साहित्य वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त होता. शहरात प्रथमच अनधिकृत झोपड्यांवर मोठ्या स्वरूपाची झालेली ही कारवाई असून, यापुढेही ती सुरूच राहणार असल्याचा इशारा पालिकेने कारवाईच्या माध्यमातून दिला आहे. अनधिकृत बांधकाम झालेले भूखंड एमआयडीसीचे असून, नियोजन प्राधिकरण म्हणून पालिका त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवत आहे; परंतु अनधिकृत बांधकामांमुळे पालिकेवर सुविधांचा अतिरिक्त ताण पडत आहे. अशातच त्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयाची तोडफोड करून विद्युत दिवे चोरले जात असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचाही आयुक्त मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमादरम्यान आढावा व्यक्त केला होता. त्यानंतरच पालिकेतर्फे शहरातील सर्वच ठिकाणच्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचे नियोजन केले असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील इतरही ठिकाणच्या २००० नंतरच्या झोपड्यांवर हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. कारवाईवेळी काही झोपड्यांमध्ये मोठमोठ्या मशिन आढळून आल्या आहेत. त्यांचा वापर नेमका कशासाठी केला जात होता याचा उलगडा झालेला नसला, तरी त्यावरून अनधिकृत झोपड्यांमध्ये उद्योगही चालवले जात होते ही बाब समोर आली आहे. बहुतांश झोपड्या बांबू व पत्र्याच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या होत्या. तर काही ठिकाणी विटांचे पक्के बांधकामही करण्यात आले होते. त्यापैकी ज्यांच्याकडे २००० पूर्वीच्या वास्तव्याचे मूळ पुरावे आहेत, अशांना वगळून इतर सर्व बांधकामे पाडण्यात आली. ही कारवाई सुरू असतानाच अनधिकृतरीत्या उभारलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचीही पळापळ झाली; परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने पालिकेने शाळेच्या अनधिकृत बांधकामाला तात्पुरता दिलासा दिला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपताच शाळेवरही कारवाई केली जाणार आहे. हटवलेल्या बांधकामांमध्ये तबेल्यांचाही समावेश आहे. रस्त्यालगत अथवा मोकळे भूखंड बळकावून त्यावर हे तबेले उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)