पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्याने सात रुग्ण आढळले. त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या ७ जणांमध्ये खारघरमधील चार, कामोठेमधील दोन तसेच कळंबोलीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी दोघे कळंबोलीमधील ३३ वर्षीय व खारघरमधील ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी आहेत. तर, कामोठेमधील दोन ५३ आणि ३५ वर्षीय सफाई कामगारांचा समावेश आहे. दोघेही मुंबई पालिकेत सफाई कामगार आहेत. खारघरमधील ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाचादेखील यामध्ये समावेश आहे. खारघर सेक्टर ४ मधील ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाला यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर कोविड १९ रुग्णालय पनवेल येथे उपचार सुरू आहेत. तसेच खारघरमधील तिसरा रुग्ण हा रियल इस्टेट एजेंट आहे. त्याच्या भावालादेखील कोरोनाने ग्रासले आहे. त्यांच्यापासूनच या रुग्णाला कोरोनाची लागण झाली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.चौथा रुग्ण हा खारघर शहरातील मित्र हॉस्पिटलमधील एक्सरे सेंटरमधील कर्मचारी आहे. हा मूळचा गोवंडी येथील रहिवासी आहे. पनवेलमधील ग्रामीण भागात बुधवारी नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.
CoronaVirus: पनवेलमध्ये सात नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 5:39 AM