महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:46 PM2020-03-13T23:46:21+5:302020-03-13T23:46:37+5:30

नवी मुंबई महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा राज्यात सर्वात कमी असून महापालिकेची आर्थिक क्षमता उत्तम असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले होते

Seventh pay commission for municipal employees | महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

Next

नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची तरतूद लागू करण्यात यावी याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने ठराव केला होता. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले. यामुळे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा राज्यात सर्वात कमी असून महापालिकेची आर्थिक क्षमता उत्तम असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले होते. फेब्रुवारी २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास मंजूर केला होता.

Web Title: Seventh pay commission for municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.