Sharad Pawar Health : शरद पवारांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी ११ रुद्राक्ष महापूजन, राष्ट्रवादी सेवादलाचं महादेवाला साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:28 PM2021-04-04T16:28:01+5:302021-04-04T17:09:58+5:30
Sharad Pawar Health : कामोठ्यातील शिव मंदिरात या महापूजेचे आयोजन करण्यात आले.
(Image Credit- India Today)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राष्ट्रवादी सेवादलाने देवाला साकडं घातलं. शरद पवार यांची तब्येत बरी व्हावी, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी नवी मुंबईतील कामोठे परिसरात ११ रुद्राक्ष महापूजन आणि महामृत्युंजय जप करण्यात आला. कामोठ्यातील शिव मंदिरात या महापूजेचे आयोजन करण्यात आले. (Navi Mumbai NCP Seva Dal Pooja for Sharad Pawar Health) यावेळी शरद पवार त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठीसुद्धा प्रार्थना करण्यात आली.
या महापूजेचे आयोजन कामोठ्यातील शिव मंदिरात करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी सेवादलाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनासंबंधी शासनानं दिलेल्या गाईड लाईन्सचे पालन करत ही पूजा पार पडली. याशिवाय शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी राज्यभरात कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहेत.
बुधवारी मिळाला डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता ठणठणीत असून बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दहा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून सोडल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी स्वत:च आपण ठणठणीत असल्याचे ट्विटरवरून स्पष्ट केले होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर ते म्हणाले, ''डॉक्टरांनी मला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र मला एखाददुसरा दिवसही बसून काढणे जमेल, असे वाटत नाही. पुढील दोन महिने तरी मला कामातून सुटी मिळणार नाही.''
दरम्यान डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. १५ दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती चांगली असेल तर त्यांच्या एण्डोस्कोपी शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.