शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

Sharad Pawar Health : शरद पवारांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी ११ रुद्राक्ष महापूजन, राष्ट्रवादी सेवादलाचं महादेवाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 4:28 PM

Sharad Pawar Health :  कामोठ्यातील शिव मंदिरात या महापूजेचे आयोजन करण्यात आले.

(Image Credit- India Today)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राष्ट्रवादी सेवादलाने देवाला साकडं घातलं. शरद पवार यांची तब्येत बरी व्हावी, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी नवी मुंबईतील कामोठे परिसरात ११ रुद्राक्ष महापूजन आणि महामृत्युंजय जप करण्यात आला.  कामोठ्यातील शिव मंदिरात या महापूजेचे आयोजन करण्यात आले. (Navi Mumbai NCP Seva Dal Pooja for Sharad Pawar Health) यावेळी शरद पवार त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठीसुद्धा प्रार्थना करण्यात आली. 

या महापूजेचे आयोजन कामोठ्यातील शिव मंदिरात करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी सेवादलाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनासंबंधी शासनानं दिलेल्या गाईड लाईन्सचे पालन करत ही पूजा पार पडली. याशिवाय शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी राज्यभरात कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहेत.

बुधवारी मिळाला डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता ठणठणीत असून बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दहा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून सोडल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

Sharad Pawar in Hospital: शरद पवारांचे सर्वच दौरे 2 आठवड्यांसाठी रद्द, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी स्वत:च आपण ठणठणीत असल्याचे ट्विटरवरून स्पष्ट केले होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर ते म्हणाले, ''डॉक्टरांनी मला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र मला एखाददुसरा दिवसही बसून काढणे जमेल, असे वाटत नाही. पुढील दोन महिने तरी मला कामातून सुटी मिळणार नाही.''

Sharad Pawar in Hospital : काय असते एण्डोस्कोपी? वेदनादायक असते का? शरद पवारांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार?

दरम्यान डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. १५ दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती चांगली असेल तर त्यांच्या एण्डोस्कोपी शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसHealthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई