भाजपा प्रवेशावरुन शरद पवारांचा उदयनराजेंना टोला, महाराज...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 09:48 AM2019-09-16T09:48:39+5:302019-09-16T09:50:07+5:30

उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar's on Udayan Rajane bjp joining, new mumbai rally of ncp | भाजपा प्रवेशावरुन शरद पवारांचा उदयनराजेंना टोला, महाराज...

भाजपा प्रवेशावरुन शरद पवारांचा उदयनराजेंना टोला, महाराज...

Next

मुंबई - साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही यावर भाष्य केले. उदनयनराजेंच्या भाजपा प्रवेशामुळे काहीही फरक पडणार नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, शरद पवार यांनी साताऱ्यातील माजी खसदार उदयनराजेंना भाजपा प्रवेशावरुन चिमटा काढला. दरम्यान, उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना टार्गेट करण्यात येत आहे. 

उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. कित्येकांनी भाजपाला उदयनराजे आणि उदयनराजेंना भाजपा झेपणार नाही, अशा शब्दात या प्रवेशाचं विश्लेषण केलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात हेच पाहायचंय, असे म्हणत त्यांच्या भाजपा प्रवेशावर टीका केली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर, जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. तर, छगन भुजबळ यांनी राजे गेले पण मावळे आहेत, असे म्हणत उदयनराजेंच्या प्रवेशानंतरही कार्यकर्ते आमच्यासोबत असल्याचं दावा केला. त्यानंतर, आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही उदनयराजेच्या भाजपा प्रवेशावर भाष्य केलंय. 

''छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्ली शहराच्या भेटीसाठी ते गेले होते. परंतु, खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे म्हणत उदयनराजेंना टोला लगावला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केले. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या!,'' असे म्हणत पवार यांनी उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: Sharad Pawar's on Udayan Rajane bjp joining, new mumbai rally of ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.