शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा

By वैभव गायकर | Published: July 13, 2023 11:39 AM2023-07-13T11:39:01+5:302023-07-13T11:39:16+5:30

दरम्यान विवेक पाटील यांच्या या निर्णयामूळे शेकाप कार्यकर्ते व्यथित झाल्याचे दिसून येत आहेत.

Shetkari Kamgar Party leader Vivek Patil's announcement of retirement from politics | शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा

शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा

googlenewsNext

पनवेल :शेकाप नेते व उरण पनवेल या विधानसभा मतदार संघाचे चार वेळा नेतृत्व केलेले माजी आमदार विवेक पाटील यांनी राजकारणातुन निवृत्तीची घोषणा केली आहे.दि.12 रोजी तळोजा कारागृहातून एक पत्र प्रकाशित करून पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.        

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी पाटील हे तळोजा कारागृहात आहेत.चार वर्षांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेतुन पाटील यांनी गंभीर आजारावर मात केली होती.मात्र प्रकृतीच्या कारणास्तव पुढे राजकारण करणे शक्य नसल्याचे आमदार पाटील यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात कळवले आहे.शेकापचा प्राथमिक सदस्यांचा देखील पाटील यांनी राजिनामा दिला आहे. दरम्यान विवेक पाटील यांच्या या निर्णयामूळे शेकाप कार्यकर्ते व्यथित झाल्याचे दिसून येत आहेत.

Web Title: Shetkari Kamgar Party leader Vivek Patil's announcement of retirement from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.