पनवेल : घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेचे आयुक्त होण्याचा मान डॉ. सुधाकर शिंदे यांना मिळाला आहे. २००७ मध्ये युपीएससी परीक्षा यशस्वी झाल्यानंतर भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) त्यांची निवड झाली होती. आयकर खात्यात त्यांनी बऱ्याच संवेदनशील प्रकरणांचा तपास केला आहे. गतवर्षी महाराष्ट्र शासनामध्ये नगर विकास खात्यात उपसचिव म्हणून ते प्रतिनियुक्तीवर रूजू झाले होते. स्मार्ट सिटी योजनेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या या काळात राज्यातील ७ शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊ शकला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी नव्या पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर त्यांची नियुक्ती केली आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या डॉ. शिंदे यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. औषधनिर्माणशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन त्यांनी केले आहे.
शिंदे यांनी स्वीकारला पनवेल महापालिका आयुक्तपदाचा पदभार
By admin | Published: October 02, 2016 3:01 AM