शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कामगारांच्या थकबाकीसाठी शिवसेना नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:14 AM

थकबाकी देण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी मंजुरीसाठी जाणिवपूर्वक आणत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी शक्रवार, १० जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत केला.

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांची उर्वरित थकबाकी देण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी मंजुरीसाठी जाणिवपूर्वक आणत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी शक्रवार, १० जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत केला. सत्ताधाऱ्यांकडून कामगारांचे शोषण होत असल्याचा आरोप केला, त्यावर स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी आरोपांचे खंडन केले.नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्र वारी झाली, या वेळी सभेच्या पटलावर शहरातील विविध नागरी विकासकामांचे प्रस्ताव प्रशासनातर्फे मांडण्यात आले होते. सभा सुरू होताच शिवसेना नगरसेवकांनी कंत्राटी कामगारांची १४ महिन्यांची उर्वरित थकबाकी देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी जाणिवपूर्वक स्थायी समिती सभेत आणत नसल्याचा आरोप केला. शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी आणि नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी कंत्राटी कामगारांच्या थकबाकीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीला आल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा इशारा दिला. विरोधी पक्षातील नगरसेवक वस्तुस्थिती ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सभा सुरू ठेवून इतर प्रस्ताव मंजूर केल्याचे सभापती गवते यांनी सांगितले. विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करीत कंत्राटी कामगारांची उर्वरित थकबाकी रक्कम देण्याची आमची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही महासभेत सदर प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समिती सभेतदेखील हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यास सांगितले होते. याबरोबर आणखी इतर प्रस्तावदेखील होते; परंतु झेरॉक्सच्या प्रती वेळेत तयार झाल्या नसल्याने प्रस्ताव आला नाही. वेळ पडल्यास विशेष सभा घेऊन प्रस्ताव पटलावर आणण्यात येईल, असे गवते म्हणाले.