शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

मातोश्रीवर धडकणाऱ्या शिवसैनिकांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोलनाक्यावर अडवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 1:03 PM

शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यापैकी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते.शिवसैनिक मुंबईतच पोहचणार नाहीत याची खबरदारी मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे.वाशी टोलनाक्यावर शिवसैनिकांच्या गाड्या अडवण्यात आल्या. त्यापैकी काही समर्थकांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले

नवी मुंबई - शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यापैकी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. शिवसैनिक मुंबईतच पोहचणार नाहीत याची खबरदारी मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने रविवारी (24 मार्च) सकाळी वाशी टोलनाक्यावर शिवसैनिकांच्या गाड्या अडवण्यात आल्या. त्यापैकी काही समर्थकांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु उर्वरित शिवसैनिक टोलनाक्यावर बस अडवल्यानंतर रेल्वेने शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहेत.

पोलिसांनी मध्यरात्री एकच्या सुमारास समर्थकांना तुळजापूर येथे रोखून परत पिटाळले. मात्र तरीही गायकवाड समर्थकांनी इतर वाहनांची सोय करत मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू केला. गायकवाड समर्थक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजीनामे देणार आहेत. त्यामुळे आज मातोश्रीवर काय घडणार, याकडे लक्ष लागलं आहे. रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार  घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवून त्यांना रोखलं. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पिटाळण्यात आलं. या नोटिसीत सकाळी आठच्या आधी गाव सोडू नये, अशी सूचना देण्यात आली होती. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची सोय करून अनेकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. त्यामुळे आज मुंबईत काय घडामोडी घडणार, याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी 22 मार्चला जाहीर केली. शिवसेनेनं आपल्या जवळपास सर्वच खासदारांना पुन्हा संधी दिली. मात्र उस्मानाबादचे खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलं. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेनं मारहाण केल्यानं गायकवाड वादात सापडले होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात आल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. काल गायकवाड समर्थकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी उमरग्यात मेळावा घेतला. यावेळी गायकवाड यांच्या एका समर्थकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाबा भोसले नावाच्या समर्थकानं ‘तिकिट पाहिजेच’ असा घोष करत सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी या समर्थकास तातडीनं रोखलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी मेळाव्याच्या ठिकाणी जमलेल्या काही इतर कार्यकर्त्यांकडूनही चार ते पाच रॉकेलच्या बाटल्या जप्त केल्या.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेOsmanabadउस्मानाबाद