उल्हासनगर : राज्यात सत्ता व मुख्यमंत्री पदा वरून भाजप- शिवसेना आमने सामने आली. अश्या वेळी गुरुवारी शहरातील गोलमैदान येथील कार्यालयात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून भाजपचे नवनिर्वाचित आमदार कुमार आयलानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रकाराने विविध चर्चेला उधाण आले असून कुमार आयलानी यांच्या राजकीय मुसद्देगिरीचे कौतुक होत आहे. तर शिंदे यांच्यावर टीकेची झोळ उठली आहे.