महाविकास आघाडीचं ठरलंय! भाजपला धक्का देण्याची तयारी; जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:53 PM2021-12-16T14:53:12+5:302021-12-16T14:57:11+5:30

भाजपची सत्ता उलथवण्यासाठी तीन पक्ष एकत्र; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, अद्याप अधिकृत घोषणा नाही

shiv sena ncp and congress alliance decides seat sharing formula for navi mumbai municipal corporation | महाविकास आघाडीचं ठरलंय! भाजपला धक्का देण्याची तयारी; जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

महाविकास आघाडीचं ठरलंय! भाजपला धक्का देण्याची तयारी; जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

Next

नवी मुंबई: विधान परिषद निवडणुकीत ६ पैकी ४ जागा जिंकल्यानं भाजपचं मनोबल उंचावलं आहे. या निवडणुकीनंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच पुढील वर्षाच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी नवी मुंबईत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची सत्ता भाजपकडे आहे. भाजपला धक्का देण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईतील महाविकास आघाडीची बैठक थोड्याच वेळापूर्वी संपन्न झाली. त्यामध्ये पुढील महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, संदीप सुतार उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील निश्चित करण्यात आला. 

नवी मुंबईत महापालिकेतील एकूण सदस्य संख्या १११ इतकी आहे. त्यात आता १० जागांची भर पडणार आहे. त्यामुळे हा आकडा १२१ वर जाईल. यापैकी ७५ ते ८० जागा शिवसेना लढवेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस २० ते २५ आणि काँग्रेस १८ ते २२ जागांवर उमेदवार देतील. एबीबी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत महापालिका निवडणूक होऊ शकते.

पुढील महापालिका निवडणुकीत सत्ता राखण्याचं आव्हान भाजप नेते गणेश नाईक यांच्यासमोर आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी नाईक भाजपमध्ये गेले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा नगरसेवकांनी हाती कमळ घेतलं. त्यामुळे राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली.

Web Title: shiv sena ncp and congress alliance decides seat sharing formula for navi mumbai municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.