पनवेलमध्ये शिवसेनेकडून बंडखोरांचा निषेध; एकनाथ शिंदेच्या फोटोला फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:56 PM2022-06-21T19:56:39+5:302022-06-21T19:57:37+5:30
बंडखोरांमुळे ठाकरे सरकार धोक्यात आले असून शिवसैनिकांमध्ये याविषयावरून प्रचंड रोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल: बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा निषेध करून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी दि.21 रोजी काळे फासले. बंडखोरांमुळे ठाकरे सरकार धोक्यात आले असून शिवसैनिकांमध्ये याविषयावरून प्रचंड रोष आहे.
पनवेल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी निषेधार्थ घोषणा देऊन त्यांचा निषेध केला. शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,उपमहानगर प्रमूख रामदास गोंधळी, आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते या वेळी बोलताना शिरीष घरत यांनी सांगतिले कि, गद्दारांना पक्षात कधीच स्थान नाही आहे. या पुढे सुद्धा ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. भाजप अश्या लोकांना खत पाणी घालण्याचे काम करत आहे पण त्यांचा डाव यशस्वी होणार नाही असे घरत यांनी स्पष्ट केले.