उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 11:17 PM2023-09-17T23:17:08+5:302023-09-17T23:17:08+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे.

Shiv Sena should send Shiv sainik to teach traitors a lesson in Uran Legislative Assembly says Shiv Sena Deputy Leader MLA Sachin Ahir | उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

googlenewsNext

मधुकर ठाकूर -

उरण : उरण विधानसभा मतदार संघात सेनेची ताकद असतानाही फक्त खोट्या आश्वासनांच्या बळावर एक अपक्ष उमेदवार निवडून येतो. जनेतेला विकासाचे स्वप्न दाखवतो. मात्र मतदार संघात तर विकास झालेला दिसत नाही.त्यामुळे आता बोलघेवड्या सरकारच्या योजनांची खरी सत्यता कार्यकर्त्यांत होऊ द्या. याच चर्चेतून जनतेपर्यत सत्य माहिती पोहचवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सेनेचे (उध्दव ठाकरे गट ) मनोहर भोईर यांना आमदार म्हणून निवडून आणा असे भावनिक आवाहन शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी उरण येथे केले.

   केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून उरण विधानसभा मतदार संघासाठी 'होऊ द्या चर्चा अभियान' कार्यक्रम उरण शहरातील श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.उरण शिवसैनिकांच्या या आयोजित मेळाव्याने होऊ द्या चर्चा अभियानाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला.

   याप्रसंगी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. शिवसैनिकांमध्ये विश्वास जागृत करतानाच उरण विधानसभा मतदार संघातील तसेच बोलघेवड्या सरकारच्या विविध फसव्या योजनांचा त्यांनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला.संपुर्ण उरण विधानसभा मतदार संघातील जनतेला सरकार करीत असलेली दिशाभूल नागरिकांच्या समोर आणण्यासाठी आता होऊ द्या चर्चा. गावा गावात सभा घेऊन जनतेत जागृती करा असे आवाहनही अहिर यांनी केले.यावेळी पालघर जिल्हा प्रवक्त्या मनीषा ठाकुर यांनी उरण मतदार संघातील केंद्र व राज्य सरकारच्या अमंलबजावणी न झालेल्या विविध योजनांची पोलखोल करीत दिशाभूल करणाऱ्या योजनांची होऊ दे आता खुली चर्चा असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार तथा विद्यमान रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर म्हणाले की मागील निवडणूकीत युती असताना युती धर्माचे पालन झाले नाही. त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु यावेळी आपल्या सोबत काॕग्रेस, राष्ट्रवाद,शेकाप असल्यामुळे  विरोधकांचा ५० हजार मतांनी पराभव करु असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.त्यामुळे कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून गावागावात होऊ द्या चर्चा सभेतून बोलघेवड्या सरकारचा विरोधात  जनजागृती करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना  केले.यावेळी रायगड जिल्हा संघटक बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जिल्हा समन्वयक सावंत , विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख   महादेव घरत, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील,चौक जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष उत्तमशेठ भोईर, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहीते, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकुर,वसंत आगीवले, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका  ममता पाटील, विधानसभा संघटिका  ज्योती म्हात्रे, उरण तालुका संघटिका भावना म्हात्रे, पनवेल तालुका संघटिका मेघा दमडे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, मुमताज भाटकर आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena should send Shiv sainik to teach traitors a lesson in Uran Legislative Assembly says Shiv Sena Deputy Leader MLA Sachin Ahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.