शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

By admin | Published: May 13, 2017 1:22 AM

शिवसेनेने पनवेल शहर महापालिकेची पहिली निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, ११ मे रोजी प्रचाराचा नारळ फोडला

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शिवसेनेने पनवेल शहर महापालिकेची पहिली निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, ११ मे रोजी प्रचाराचा नारळ फोडला. सेनेला प्रचारात शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सेनेचे संपर्क प्रमुख होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांना पाहण्यासाठी महिलावर्गाची मोठी गर्दी होत आहे. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शेकाप विरु द्ध भाजपा अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन पनवेलमध्ये ताकद आजमावत आहे. खारघर प्रभाग पाचमधील बेलपाडा गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेतल्यावर शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली. यावेळी सेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख शिरीष घरत हे उपस्थित होते. बांदेकर मतदारांशी संवाद साधत असल्याने सेनेच्या प्रचार फेऱ्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला निवडणुकीच्या प्रचारसभेत उतरविण्याच्या तयारीत आहे. खारघरमध्ये देखील मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार शिवसेनेनेही सभेची आखणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह अनेक नेते प्रचारात दिसण्याची शक्यता आहे.