शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार

By admin | Published: November 12, 2016 06:34 AM2016-11-12T06:34:53+5:302016-11-12T06:34:53+5:30

अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना अशी शेकाप विरोधी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न

Shiv Sena will contest the election on its own | शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार

शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार

Next

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना अशी शेकाप विरोधी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू होते; परंतु या आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच बिघाडी झाल्याने अखेर एक थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि ५ नगरसेवक उमेदवार अशा सहा उमेदवारांच्या माध्यमातून शिवसेना अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी अलिबाग तालुकाप्रमुख दीपक रानवडे, अलिबाग शहरप्रमुख कमलेश खरवले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. सुशील पाटील व पाच नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.
आघाडीच्या गणिताप्रमाणे पाच नगरसेवक उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले होते; परंतु गुरुवारी संध्याकाळपर्यंत आघाडीतील एक प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेसने आघाडीबाबतचा अंतिम निर्णय घेतला नाही. परिणामी, अखेर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या चर्चेतील गणितानुसार आम्ही नगराध्यक्ष आणि पाच नगरसेवक असे सहाच अर्ज दाखल करू शकलो. दरम्यान, आघाडी झाली असती तरी आम्ही धनुष्यबाण या आमच्या पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार होतो. परिणामी, सेनेचे अस्तित्व स्वतंत्रच राहणार होते तसे आताही आम्ही ते ठेवले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी आणि नगरसेवकपदाचे उमेदवार म्हणून पंकज झाडेकर (प्रभाग-१/ब-सर्वसाधारण), सागर बडमे (प्रभाग-३/अ,ना.मा.प्र.सर्वसाधारण), श्वेता पालकर (प्रभाग-४/ब, सर्वसाधारण महिला), राखी खरवले (प्रभाग-७/ब, सर्वसाधारण) असे एकूण सहा जण निवडणूक रिंगणात असल्याची माहिती अ‍ॅड. सुशील पाटील यांनी दिली. विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही मतदारांकडे जाणार आहोत.

Web Title: Shiv Sena will contest the election on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.