पालिका शाळेतील चिक्कीला शिवसेनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:18 AM2018-09-29T05:18:52+5:302018-09-29T05:19:01+5:30
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे. नाहटा यांनी, शुक्र वार, २८ सप्टेंबरला शिवसेनेच्या शिष्टमंडळासह पालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्यांवर पालिकेच्या माध्यमातून मार्ग काढून त्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी केली आहे.
शहरातील विविध नागरी समस्यांवर पालिकेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी या वेळी पालिका शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत पोषक न्याहारी देण्यात यावी. करावे गावामधील ग्रामस्थांना सिटी सर्व्हे, मलनि:सारण, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर यासारख्या भेडसावणाºया समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, स्पोटर््स नर्सरी सुरू करावी, वाशी येथील क्र ीडांगणाची सुधारणा करावी, शहरात अपुºया पार्किंगच्या जागांमुळे होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणीदेखील या वेळी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. विस्तारित गावठाणाच्या सिटी सर्व्हेचे काम सिडको करीत असल्याचे आयुक्त रामास्वामी एन. यांनी या वेळी सांगितले.
नवी मुंबई शहरातील गावांची ओळख कायम राहावी, यासाठी गावांच्या बाहेर सुसज्ज सुशोभित कमान महापालिकेमार्फत बांधण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांकडे उपस्थित केलेल्या शहरातील विविध नागरी समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या शिष्टमंडळात नाहटा यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, एम. के. मढवी, किशोर पाटकर, काशिनाथ पवार, रामदास पवळे, रंगनाथ औटी, विशाल ससाणे, आकाश मढवी, चेतन नाईक, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, महिला शहर संघटक रोहिणी भोईर, माजी नगरसेवक रतन मांडवे, मधुकर राऊत, परिवहन सदस्य समीर बागवान आदी उपस्थित होते.