विविध कार्यक्रमांतून शिवरायांना मानाचा मुजरा

By Admin | Published: February 20, 2017 06:43 AM2017-02-20T06:43:03+5:302017-02-20T06:43:03+5:30

महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७व्या जयंतीनिमित्त

Shivaji Maharaj was honored by various programs | विविध कार्यक्रमांतून शिवरायांना मानाचा मुजरा

विविध कार्यक्रमांतून शिवरायांना मानाचा मुजरा

googlenewsNext

नवी मुंबई : महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवरायांना मानाचा मुजरा देत शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली होती.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे, आमदार संदीप नाईक व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्र म समितीचे सभापती लीलाधर नाईक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त तृप्ती सांडभोर, कार्यकारी अभियंता सुनील लाड उपस्थित होते.
नेरुळमधील गणपतशेठ तांडेल मैदानासमोरील परिसरात शिवजन्मोत्सव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. बेलापूरमध्ये नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयकर कॉलनी परिसरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीनेही शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

ढोल-ताशांच्या गजरात निघाली मिरवणूक
पनवेल : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेतर्फे रविवारी भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या शाळा, शासकीय तसेच राजकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. या मिरवणुकीत ढोल-ताशा, लेझीम पथक सहभागी झाले होते. यावेळी शाळकरी मुलांनी काढलेला चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी फलक घेऊन पाणीबचतीचा व प्लास्टिक बंदीचा, वृक्षारोपणाचा, भ्रूणहत्या बंदीचा, मतदानाचा अनोखा संदेश दिला.
शहरातील शिवाजी चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात आली. शहरातील या मिरवणुकीमध्ये नादस्फूर्ती आणि स्वरगर्जना हे ढोलपथक महापालिका शिक्षण विभाग आणि के. व्ही. कन्या शाळांचे चित्ररथ, व्ही. के. हायस्कूल आणि मनपा पोदी क्र मांक ८ व मनपा धाकटा खांदा ६ यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. त्याचबरोबर मनपा शाळा क्र मांक २ व ३ तसेच फडके मराठी, इंग्रजी शाळा यांचाही सहभाग होता. खुल्या गटामध्ये कैलासवती ट्रेडिंग आणि उत्तमराव गिरे यांचाही सहभाग होता. या उपक्र मात ढोल-ताशा वाजविणारे शेकडो युवक-युवतींसह पालकही सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मिरवणुकीतील शिवप्रेमींना पाणी व बिस्किटे दिली जात होती. मिरवणुकीत पनवेलमधील अनेक मंडळे सहभागी झाली होती. ढोल-ताशे यांच्या गजरात मिरवणुकीला सुरु वात झाली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज होती. काही मार्गावरील वाहतूक मिरवणूक काळात बंद ठेवण्यात आली होती. मिरवणूक, प्रभातफेरी, मोटारसायकल रॅली आदी उपक्र मांनी शिवजयंती साजरी झाली. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, आयुक्त सुधाकर शिंदे, माजी आमदार विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
पनवेल शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी रविवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे सर्वत्र ऐकू येत होते. भगवेमय वातावरण आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून रविवारी शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
परिसरात वाजतगाजत मिरवणुकीला सुरु वात झाली. आगामी महापालिका निवडणुकीची छाया या सोहळ्यावर पडल्याचे पाहावयास मिळाले. पनवेल महापालिकेची निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली. या शिवजयंतीला साऱ्याच पक्षाचे नेते हजर होते. कार्यकर्त्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर भगवे झेंडे फडकावले.
सकाळपासून शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांनी वातावरणाचा नूर पालटला. राजकीय पक्षांबरोबर इतर संघटनांकडून विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. नादस्फूर्ती व युवा नाद या ढोल पथकाचा आवाज पनवेलमध्ये घुमत होता.

खांदेश्वरमध्ये कार्यक्रम


च्खांदेश्वर स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने प्रत्येक वर्षी रेल्वे स्टेशनसमोर शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही रिक्षा चालकांनी जयंती उत्सव व भंडाऱ्याचे आयोजन केले होते.
च्दिवसभर शिवचरित्राला उजाळा देणारे कार्यक्रम आयोजित केले होते. याप्रसंगी अध्यक्ष मच्छींद्र पाटील, ज्ञानेश्वर भगत, गणेश हुद्दार, योगेश तांबडे, विनोद भगत, प्रकाश म्हात्रे व इतर पदाधिकारी यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयघोष केला.

Web Title: Shivaji Maharaj was honored by various programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.