शिवसमर्थ स्मारक लोकार्पण सोहळा, शिवराय अन् समर्थ रामदास भेटीचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 03:17 AM2019-02-19T03:17:23+5:302019-02-19T03:18:04+5:30

उरण-दास्तान येथील शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते बटण दाबून करण्यात आले.

Shivsamtha memorial celebration ceremony, statue of Shivrajaya and Samarth Ramdas | शिवसमर्थ स्मारक लोकार्पण सोहळा, शिवराय अन् समर्थ रामदास भेटीचा पुतळा

शिवसमर्थ स्मारक लोकार्पण सोहळा, शिवराय अन् समर्थ रामदास भेटीचा पुतळा

googlenewsNext

उरण-दास्तान येथील शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते बटण दाबून करण्यात आले. यावेळी अलोट जनसमुदाय उपस्थित होता. जेएनपीटीने तब्बल ३० कोटी खर्चून शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित या शिवसमर्थ स्मारकाची उभारणी केली आहे. भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा अनोखा मेळ या स्मारकात दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन, रायगड पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. निरंजन डावखरे, भरत गोगावले, आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, जेएनपीटी अध्यक्ष संजीव सेठी, जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

मन, मानव आणि मानवता याची शिकवण आमच्या प्रतिष्ठानतर्फे देऊन समाज सुधारण्याचे काम केले जात आहे. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भूमिका आपल्याकडे असतील, तरच आपल्या चुकांची उकल होते.
- सचिनदादा धर्माधिकारी

उरणमध्ये प्रथमच एवढ्या भव्य कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. अनेक दासभक्त शनिवारपासूनच कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.
२सोहळ्यासाठी पार्र्किं ग व्यवस्था, उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसांसह दासभक्तांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिस्तबद्ध पद्धतीने अनुयायी नमस्कार, आदरभाव स्वीकारत मार्गस्थ होत होते. कार्यक्र म सोहळ्याच्या ठिकाणी गायक नंदेश उमप, वैशाली सामंत यांनी गीते सादर केली.

दासभक्तांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती

Web Title: Shivsamtha memorial celebration ceremony, statue of Shivrajaya and Samarth Ramdas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.